मुंबई विद्यापीठ संलग्न सर्व महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी ‘अभाविप’चे सदस्यांना निवेदन

0

मुंबई : गेली दोन वर्षे कोविड महामारीच्या तडाख्यामुळे सर्व शिक्षण क्षेत्र अनेक विपरीत प्रसंगांना तोंड देत आहे. महामारीमुळे शिक्षणाची सर्वसमावेशकता, गुणवत्ता आणि परिणामकारकता यांच्यावर दूरगामी परिणाम झाले आहेत. प्रसंगाच्या गंभीरतेमुळे आभासी पद्धतीच्या शिक्षणाचा आणि आभासी परीक्षांचा आपल्याला अपरिहार्य स्वीकार करावा लागला. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही याची काळजी मुंबई विद्यापीठ घेत असले तरीही, आता लसीकरण आणि सुयोग्य खबरदारी यांमुळे परिस्थिती पूर्वपदावर येत असताना या पद्धतींचा वापर योग्य आहे का, असा प्रश्न निर्माण होतो.

समाजाची सर्व क्षेत्रे आणि इतर जीवनमान पूर्वपदावर येत असताना अजूनही मुंबई विद्यापीठातील महाविद्यालये आभासी पद्धतीने किंवा मिश्र स्वरूपात कार्यरत आहेत. यासाठी आज अभाविप कोंकण प्रदेशाच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या सर्व अधिसभा सदस्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे विद्यार्थी हिताचा विचार करून विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालये प्रत्यक्ष स्वरूपात संपूर्ण क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय अधिसभा बैठकीत सार्वमताने घ्यावा अशी मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेवर आभासी शिक्षणाचा विपरीत परिणाम होताना दिसत आहे. आभासी शिक्षण आणि आभासी मुल्यांकना मुळे ढळलेली एकाग्रता, मुलभूत आकलनाचा अभाव अश्या समस्या यापुढे अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकतात असे अभाविपचे सुविचारीत मत आहे.

“आभासी मूल्यांकनाचा आग्रह धरणे, त्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेला गालबोट लावणे अशी कृत्ये करणारा जमाव ही सर्व शिक्षणाच्या अध:पतनाची लक्षणे आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी सर्वसमावेशक, गुणवत्तापूर्ण आणि परिणामकारक शिक्षणाची वाट मोकळी करणे गरजेचे आहे”, असे मत अभाविप कोंकण प्रदेश मंत्री अमित ढोमसे यांनी व्यक्त केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:30 AM 18-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here