पाचेरीआगर येथे शाळा व्यवस्थापन सक्षमीकरण प्रशिक्षण

0

गुहागर : पाचेरीआगर केंद्राचे केंद्रप्रमुख विश्वास खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचेरी आगर केंद्राचे शाळा व्यवस्थापन सक्षमीकरण प्रशिक्षण जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा पाचेरी आगर नं. १ शाळेत नुकतेच झाले.

बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारानुसार शाळा व्यवस्थापन समितीची निर्मिती करण्यात आली. तसेच महाराष्ट्र शासनाच्या १७ जून २०१० च्या आदेशानुसार शाळा व्यवस्थापन समितीची कार्ये आणि रचना निश्चित करण्यात आली. या समितीची दर दोन वर्षांनंतर पुनर्गठण करण्यात येते.

दरवेळी नवनवीन सदस्य येत असतात त्यांना आपल्या जबाबदारीची ओळख व्हावी या हेतुने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणात SMC ची रचना व जबाबदारी, शाळेचे आर्थिक व्यवस्थापन, बालकांचे हक्क व सुरक्षितता, गुणवत्तापूर्ण शिक्षण, या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणाला मार्गदर्शक म्हणून जि.प.आदर्शशाळा शिवणेनं.२ चे आदर्श शिक्षक दिनेश जाक्कर, असोर शाळेचे सीताराम धाकू कावणकर हे लाभले. या प्रशिक्षणात पाचेरी आगर केंद्रातील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ५० टक्के शिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here