देशातील कोरोना रुग्णांमध्ये 18 टक्के घट; 24 तासांत 2,075 नवे रुग्ण

0

नवी दिल्ली : देशातील कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या नवीन रुग्णांमध्ये 18 टक्के घट नोंदवण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 2 हजार 75 नवीन रुग्ण आढळून आले असून 71 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, काल कोरोनाचे 2 हजार 528 रुग्ण आढळले असून 149 जणांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी दिवसभरात देशात 4 हजार 722 लोक बरे झाले. त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या 27 हजार 802 वर पोहोचली आहे. तसेच कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 16 हजार 352 झाली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 61 हजार 926 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे 181 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. शुक्रवारी दिवसभरात 5 लाख 84 हजार 177 डोस देण्यात आले. आतापर्यंत कोरोना लसीचे 181 कोटी 4 लाख 96 हजार 924 डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दोन कोटींहून अधिक (2,16,60,637) लसी देण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:11 AM 19-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here