अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार : जिल्हाधिकारी

0

रत्नागिरी : कोरोनाबाबत अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिल्या आहेत. जिल्हाभरात शासकीय रुग्णालयासोबतच एकूण ९ रुग्णालये सज्ज ठेवण्यात येणार असून, यात पाच खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. एकूण १०० आयसोलेशन बेडची तयारी ठेवण्यात आली असल्याचे त्यांनी माहिती दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर आदी उपस्थित होते. तसेच, सर्वसामान्य माणसांना मास्क वापरणे आवश्यक नाही. मात्र आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी मास्क वापरणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here