एमआयएम महाविकास आघाडीसोबत गेली तरी काहीच फरक पडणार नाही : चंद्रकांत पाटील

0

मुंबई : एमआयएम महाविकास आघाडीसोबत गेली तरी काहीच फरक पडणार नसल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. आमची त्यांना मोठी भीती निर्माण झाली आहे.

भाजप चोख कारभार करते, त्यामुळं भाजप सोडून कोणीही आलं तरी चालेल अशी त्यांची अवस्था असल्याचा टोला पाटील यांनी लगावला.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यावर देखील चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. रावसाहेब दानवे म्हणाले ते सत्य आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात अर्थसंकल्पाची चिरफाड केली. सर्वाधिक निधी हा राष्ट्रवादी काँग्रेसला जातोय, त्यामुळं सत्ताधारी पक्षातील आमदार नाराज आहेत. आमदार अवस्था आहेत म्हणल्यावर 5 कोटी दिले. आमदाराला 5 कोटी कशासाठी असा सवालही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

रावसाहेब दानवे जे बोलले ते जगजाहीर आहे. या भ्रष्टाचारी सरकारला पाडण्यासाठी आम्ही आम्ही सर्वांना आवाहन करणार आहोत. आम्हाला कोणी बांधलेलं नाही असेही पाटील यावेळी म्हणाले. सेनेची खदखद रोज समोर येत आहे. उद्धवजी लॉलीपॉप देतात मग पुन्हा सगळं शांत होतं असेही पाटील म्हणाले.

तुम्हाला पुरावे समोर आणायला कोणी रोखलयं असा सवालही पाटील यांनी महाविकास आघाडीला केला. पोकळ धमक्याशिवाय हे काही करत नाहीत. आम्ही मात्र पुरावे देतोय. तसेच मंत्री अनिल परब यांच्या विषयातही निर्णय घ्यावा लागेल असे पाटील यांनी सांगितले. 3 वर्षात तांत्रिक बाबीचा विचार करुन प्रकल्प तयार झाला. त्यानंतर टेंडर प्रक्रिया सुरु झाली. त्यानंतर वर्क ऑर्डर निघाल्यावर हे जागे झालेत. राजकीय सुडा पोटी हे सगळं सुरु आहे. पुण्याच्या लोकांना हे सगळं कळत असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:55 PM 19-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here