‘मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक’ आता ‘नाना शंकरशेठ टर्मिनस’ या नावाने ओळखले जाणार

0

पश्चिम रेल्वे मार्गावरील ‘मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानका’चे नामांतरण करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या स्थानकाला मुंबईचे आद्य शिल्पकार ‘नाना शंकरशेठ’ यांचे नाव देण्यात यावे असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यामुळे आता मुंबई सेंट्रल टर्मिनसचे ‘नाना शंकरशेठ टर्मिनस’ असे नामकरण करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेने मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे नामकरण करण्याची मागणी केली होती. आता या नावाला केंद्र सरकारने मंजूरी दिल्यास हे स्थानक ‘नाना शंकरशेठ टर्मिनस’ या नावाने ओळखले जाईल. या अगोदरही मुंबईतील विविध स्थानकांचे नाव बदलण्यात आले आहे. ‘एल्फिन्स्टन रोड’ स्थानकाचे नाव बदलून ते प्रभादेवी असे करण्यात आले होते. त्यानंतर आता मुंबई सेंट्रेल रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यात येणार आहे. या रेल्वे स्थानकाला ‘नाना शंकरशेठ टर्मिनस’ असे नाव देण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे नाना शंकरशेठ हे भारतातील पहिल्या रेल्वे कंपनी ‘ग्रेट ईस्टर्न रेल्वे’चे पहिले संचालक होते. त्यामुळे त्यांना ‘भारतीय रेल्वेचे पितामह’ असेही म्हटले जाते. नाना शंकरशेठ हे विश्वासू आणि प्रामाणिक व्यापारी होते. ते व्यावसायिक असले तरी त्यांचे सामाजिक कार्य महत्त्वाचे आहे. त्यांनी आपल्या संपत्तीतील काही हिस्सा सामाजिक कामासाठी दान केला होता. नाना शंकरशेठ यांनी सती बंदीच्या कायद्यालाही पाठिंबा दिला होता. तसेच १८४८मध्ये त्यांनी मुलींसाठी शाळा सुरु केली होती.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here