चिपळूण : खेर्डी ग्रामपंचायत जवळ असणाच्या इमारतीवरील मोबाईल कंपनीच्या टॉवरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन नुकसान झाले आहे. शुक्रवारी (दि.२) दुपारी २:४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांच्या कार्यालयाच्या इमारतीवरील टॉवरमधून अचानक धूर येऊ लागला. यामध्ये मोबाईल कंपनीची वायरिंग जळाली आहे. यानंतर घटनास्थळी चिपळूण नगर परिषदेचा अग्नीशमन बंब दाखल झाला. जोरदार वारा व पावसामुळे हे शॉर्ट सर्किट झाले असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे.
