रेल्वे प्रवासात १७ वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू

0

रत्नागिरी: दोन मित्रांसोबत सीईटीच्या क्लाससाठी चिपळूणकडे निघालेल्या १७ वर्षीय तरुणाचा रेल्वे प्रवासात झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ही घटना आडवलीदरम्यान घडली. तो मुलगा सावंतवाडी-दिवा पॅसेंजरच्या दरवाजात बसलेला होता. त्या तरुणाला अज्ञात वस्तूची धडक बसल्यामुळे गंभीर जखमी झाला. दरवाजात बसून प्रवास करणाऱ्या त्या तरुणाला नेमके कशाची धडक बसली, याची मिळली नाही; मात्र तो दरवाजातून बाहेर वाकून बघत असताना ही दुर्घटना घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. प्रसाद याने आपल्या मित्रांसोबत सौंदळ रेल्वे स्थानकावर त्यांनी दिवा पॅसेंजर पकडली. प्रसादचे दोन मित्र डब्यात फिरण्यासाठी गेले होते. फिरून आल्यानंतर त्यांना प्रसाद रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here