‘महाराष्ट्रात सुराज्य यावं म्हणून…’; राज ठाकरेंनी शिवजयंतीनिमित्त मनसैनिकांना दिली ‘ही’ शपथ

0

मुंबई : तिथीनुसार आलेल्या शिवजयंतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईतील शिवाजी पार्कात सोहळ्याचे आयोजन केलं आहे. शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थिती सोहळा साजरा होत आहे. यावेळी राज ठाकरे यांनी शिवजयंतीसाठी जमलेल्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आहे. तर, शिवजयंतीच्या निमित्ताने राज यांनी मनसे कार्यकर्त्यांना शपथ दिली आहे.

शिवाजी पार्कमध्ये ढोल- ताशांच्या गजरात आज शिवजयंती साजरी होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या सोहळ्यात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांसोबत व लहानग्या मुलांसोबत संवाद साधला. व त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत केलं. या दरम्यान राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना शपथ दिली. कार्यकर्तांना शपथ देताना राज ठाकरेंनी उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलेली शपथ

आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शपथ घेतो की स्वराजाच्या उभारणीनंतर महाराजांनी जी सुराज्याची घडी बसवण्याचा प्रयत्न केला. त्याला अनुसरुन महाराष्ट्रात सुराज्य व्हावं म्हणून सर्वजण प्रयत्नाची पराकाष्टा करू. हे स्वराज्य स्थापन करताना जातीजातींमध्ये हरवलेला समाज पुन्हा एक होईल, राज्यात महिलांना सुरक्षित वाटेल, महिलांचा आत्मसन्मान राहिलं, युवकांना रोजगार मिळेल, इथलं प्रत्येक मुलं शाळेत जाऊन शिकत असेल, नागरिकांना आरोग्य व्यवस्था मिळेल, इथली शहर, गावं, तांडे सुंदर व सुरक्षित असतील, भ्रष्टाचार नष्ट होईल, आमच्या शेतकरी बंधु- भगिनींना शेतमालाल भाव मिळेल, यासाठी जे पडेल ते करू.

छत्रपती शिवरायांनी एका स्वाभिमानी, स्वावलंबी स्वराज्याचे स्वप्न आम्हाला दिलं आहे. याचे स्मरण ठेवून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजन्म काम करु. आम्ही महाराजांचे मावळे आहोत, सैनिक आहोत याचा आम्हाला कधीही विसर पडणार नाही. हे वचन देऊन आणि महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही आमची संपूर्ण निष्ठा त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला वाहतो महाराष्ट्र धर्मासाठी एकनिष्ठतेसाठी व्यक्त करतो.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:13 PM 21-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here