कोकणातील ‘शिमगोत्सव-प्रथा आणि परंपरा’वर लवकरच माहितीपट

0

रत्नागिरी : कोकणातील गावागावांमधील वेगवेगळ्या प्रथा-परंपरा कशा असतात, याविषयीचा ‘शिमगोत्सव-प्रथा आणि परंपरा’ हा माहितीपट लवकरच तयार होणार आहे.

कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपतीच्या सणांना त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात. कोकणातील शिमगोत्सव म्हणजे विविध वैशिष्ट्यपूर्ण पद्धती, परंपरा, लोककला यांचा आविष्कार असतो. फाल्गुन शुद्ध पंचमीपासून साधारणतः गुढीपाडव्यापर्यंत हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. बाहेरगावी असलेले चाकरमानीही हमखास शिमगोत्सवासाठी गावी येतात. ग्रामदेवतेच्या पालख्या गावागावांत फिरत असतात आणि सगळीकडे एक वेगळेच जल्लोषाचे वातावरण असते.

या पालख्या का नाचवतात, कशा नाचवतात, होळी कशी आणतात, गावागावांमधील वेगवेगळ्या प्रथा-परंपरा कशा असतात, अशा प्रश्नांची उत्तरे ‘शिमगोत्सव-प्रथा आणि परंपरा’ या माहितीपटातून मिळणार आहेत. आशीष निनगुरकर लिखित-दिग्दर्शित या माहितीपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त नुकताच पार पडला. या माहितीपटाचे संपूर्ण चित्रीकरण संगमेश्वर तालुक्यातील वांद्री, उक्षी आणि आंबेड गावांत होणार आहे. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा माहितीपट प्रदर्शित केला जाणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:38 PM 21-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here