आंबा घाटात मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाचा घातपातच

0

रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात चार दिवसांपूर्वी एका अज्ञात तरूणाचा मृतदेह मिळून आला होता. शवविच्छेदनानंतर या तरूणाचा घातपात झाल्याचे उघड झाले आहे. मृतदेहाजवळ कोणताच पुरावा नसल्याने अद्यापही ओळख पटलेली नाही. अज्ञात आरोपींवर देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेहाचे काही अवशेष डीएनए टेस्टसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती पोलीसांकडून प्राप्त झाली आहे. हा मृतदेह शवविच्छेदन करण्याकरीता रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला होता. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर या तरुणाच्या डोक्यात लोखंडी सळी अथवा हातोडीने हल्ला झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबात देवरूखच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here