आयपीएलचे सामने प्रेक्षकांविनाच?; केंद्राने राज्य शासनाला पाठवले सावधानतेचे पत्र

0

नवी दिल्ली : आयपीएलच्या यंदाच्या १५व्या सत्राला सुरुवात होण्यासाठी केवळ काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. २६ मार्चपासून वानखेडे स्टेडियमवर गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याने यंदाच्या आयपीएलचे बिगूल वाजतील.

मात्र, सध्या पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याने एक संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला सावधानतेचा इशारा देणारे पत्र पाठवून काळजी घेण्याचे सुचविले आहे. त्यामुळे आयपीएल पुन्हा एकदा प्रेक्षकांविना रंगण्याची चर्चा रंगू लागली आहे.

यंदाच्या आयपीएल सामन्यांसाठी महाराष्ट्र सरकारने २५ टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्याची परवानगी बीसीसीआयला दिली आहे. मात्र, दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. भारतात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला होता. त्यातच यंदा आयपीएलचे ५५ साखळी सामने मुंबईत, तर १५ साखळी सामने पुण्यात खेळविण्यात येणार आहेत. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडून पत्र मिळाल्याचे माहिती दिली.
युरोपियन देश, द. कोरिया आणि चीन येथे पुन्हा एकदा कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. याकडे लक्ष वेधताना आरोग्य विभागाने सावध राहून आवश्यक उपाययोजना करण्यास सांगितले आहे. त्याचवेळी, आयपीएल सामन्यांच्या आयोजनाबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही, असेही टोपे यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:02 PM 21-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here