रत्नागिरी गावखडी येथे ८२ ऑलिव्ह रिडले जातीच्या कासव्याच्या पिल्लांची समुद्राकडे झेप

0

रत्नागिरी : दि. 20 मार्च, 2022 रोजी गावखडी येथे संरक्षित करण्यात आलेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या समुद्री कासवाच्या घरट्यातून ८२ पिल्ले बाहेर येत समुद्रात झेपावली.

जिल्हाधिकारी, रत्नागिरी डॉ. बी एन पाटील, तहसीलदार, राजापूर श्रीमती जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पिल्ले समुद्रात सोडण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी यांच्या पत्नी श्रीमती स्मिता पाटील, रत्नागिरी प्रादेशिक वन विभागाच्या वनक्षेत्रपाल श्रीमती लगड आणि कर्मचारी वृंद, कांदळवन कक्ष रत्नागिरी आणि कांदळवन प्रतिष्ठान मुंबई यांचे कर्मचारी, सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे श्री निलेश बापट, ग्रामपंचायत गावखडी सरपंच, श्री. तोडणकर, कांदळवन सहव्यवस्थापन समिती, गावखडीच्या अध्यक्ष श्रीमती आंब्रे तसेच पर्यटक, निसर्ग प्रेमी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

ऑलिव्ह रिडले जातीच्या मादी कासवाने घरटे बनविल्यानंतर साधारण ५० ते ६० दिवसानंतर पिल्ले घरट्यातून बाहेर येण्यास सुरुवात होते, अशी माहिती कासव मित्र प्रदीप डिंगणकर यांनी दिली.

या प्रसंगी गावखडी समुद्रकिनाऱ्यावर कांदळवन प्रतिष्ठान, मुंबई मार्फत लावण्यात आलेले कांदळवन व गावातील जैवविविधते बाबत माहिती फलकांचे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:11 PM 21-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here