रत्नागिरीत आज जलप्रशिक्षण कार्यशाळा

0

रत्नागिरी : जागतिक जलदिनानिमित्त जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने आज (दि. २२ मार्च) जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने रत्नागिरीच्या अल्पबचत सभागृहात आज सकाळी ११ वाजता देखभाल दुरुस्तीबाबत एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाला जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, प्रकल्प संचालक अमोल भोसले, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता डी. एस. परवडी, जगदीश पाटील, वरिष्ठ भूवैज्ञानिक बी. आर. टोणपे उपस्थित राहणार आहेत.

पाणी आणि स्वच्छता कार्यक्रमात स्थानिक स्वराज्य संस्थेमधील लोकप्रतिनिधी आणि लोकसहभागाचे महत्त्व याविषयी युनिसेफचे जयंत देशपांडे, पाणी पुरवठा योजनांची देखभाल दुरुस्ती याविषयी युनिसेफचे मंदार साठे, पावसाचे पाणी साठविण्याविषयी पर्जन्यजलसंचयन सल्लागार संदीप अध्यापक, पाणी गुणवत्ता आणि त्याचे महत्त्व याविषयी पाणी गुणवत्ता निरीक्षक प्रभाकर कांबळे आणि पाणी गुणवत्ता सल्लागार अक्षया करंगुटकर, जागतिक जल दिन आणि जलजागृती सप्ताहाविषी अंमलबजावणी साह्य यंत्रणेचे समन्वयक कुमार शिंदे मार्गदर्शन करणार आहेत.

जागतिक जल दिनानिमित्त जलजागृती सप्ताहादरम्यान स्वच्छता सर्वेक्षण मोहीमही राबविली जाणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:16 AM 22-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here