शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन लांबणीवर

0

चीनसह जगभरात हैदोस घालणाऱ्या करोना विषाणूने आता भारतात आपले पाय रोवले आहे. कोरोनाचा भारतात पहिला बळी गुरुवारी (दि. 12) गेला आहे. त्यामुळे संपूर्ण देशाला करोनाची धडकी भरली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाला खबरदारी पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाणे, तोंडाला मास्क लावणे यांसारख्या अनेक गोष्टी लोक करताना दिसत आहे. तसेच गर्दी होतील असे कार्यक्रम, क्रिकेट सामने देखील रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषेदेचे 100वे महाराष्ट्रव्यापी नाट्यसंमेलन पुढे ढकलण्यात आले आहे. याची माहिती संमेलनाचे अध्यक्ष नवनाथ कांबळीने यांनी एका दिली आहे. शतक महोत्सवी मराठी नाट्य संमेलनानिमित्त महाराष्ट्रभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. 25 मार्च ते 14 जून या कालावधीत नाट्य जागर मांडण्यात येणार होता. परंतु कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहून नाट्य संमेलन अनियमित काळासाठी पुढे ढकलण्यात आलं आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here