मुंबई येथे आज जल जनविकास परिषद

0

चिपळूण : आंतरराष्ट्रीय जलदिनाचे औचित्य साधून जन आंदोलनच्या माध्यमातून मंगळवार (दि. २२ ) रोजी मुंबई येथे जल जनविकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. वारंवार येणाऱ्या पुराची कारणे, त्यावर उपाययोजना, तज्ज्ञ अभ्यास गटाचे अहवाल या संदर्भात या परिषदेमध्ये चर्चा होणार आहे.

दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, जलसंपदामंत्री जयंत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत, विधान परिषद अध्यक्षा डॉ. नीलम गो-हे आदी मान्यवर उपस्थित राहाणार आहेत.

याचवेळी पहिल्या सत्रात अहवालाचे सादरीकरण व तज्ज्ञांचे मार्गदर्शन, दुसऱ्या सत्रात प्रश्नोत्तरे तर तिसऱ्या सत्रात निष्कर्ष, कार्यवाही, कार्य योजना व पुढील दिशा ठरविण्यात येईल.

यावेळी पूर परिस्थिती, पर्यावरण बदल, नैसर्गिक स्थिती या वरील कारणे, उपाययोजना या संदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होणार आहे.

उदय गायकवाड, विजय दिवाण, प्रमोद चौगुले, सतीश भिंगारे, राजन इंदुलकर, राजेश कुलकर्णी आदी पर्यावरण अभ्यासक व जलतज्ज्ञ या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत. जल जन विकास परिषदेच्या मेधा पाटकर, डॉ. रवींद्र वोरा या संयोजन समितीच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:31 PM 22-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here