गोगटे जोगळेकर महाविद्यालयात २४ रोजी ‘विज्ञान प्रचार व प्रसार’ मार्गदर्शन सत्र

0

रत्नागिरी : मातृभाषेतून विज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मराठी विज्ञान परिषद, मुंबई ही सन १९६४ पासून कार्यरत आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे सन १९७५ पासून ही परिषद कार्यरत आहे.

परिषदेचे कार्यवाह अ. पां. देशपांडे हे गुरुवार (दि. २४) रोजी सकाळी ११.०० वाजता केळकर सेमिनार हॉल, मुख्य इमारत, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे मार्गदर्शन करणार आहेत. शहरातील माध्यमिक शाळेतील किमान दोन विज्ञान शिक्षक व पाच विद्यार्थी यांनी या मार्गदर्शनास आपली उपस्थिती नोंदवावी, असे आवाहन महाविद्यालायचे प्र. प्राचार्य डॉ. पी.पी. कुलकर्णी यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:34 PM 22-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here