‘जीआयटी’तर्फे लवेल येथे उद्या कार्यशाळा

0

लोटे : घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे लवेल येथे बुधवार (दि.२३) रोजी माध्यमिक शिक्षक व प्राध्यापकांसाठी एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

विज्ञान अथवा गणित शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी ही कार्यशाळा असणार आहे. यावेळी अटल टिंकरिंग लॅब प्रभावी पद्धतीने राबविण्यासाठी लागणारी कार्यप्रणाली व त्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा सहयोग असा या कार्यशाळेचा विषय आहे.

अनेक माध्यमिक विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये शासनाने अटल लॅब तयार करण्यासाठी तरतूद केली आहे. त्यानुसार या अटल लॅबची स्थापना करण्यात आली आहे. या लॅबच्या माध्यमातून ‘प्रयोगातून शिक्षण’ ही संकल्पना राबवली जाणार आहे. ती कशी राबवली जाईल, त्याचा उपयोग कसा करावा या बाबत कार्यशाळेत माहिती देण्यात येणार आहे.

कार्यशाळेत विज्ञान, गणित शिक्षक व प्राध्यापकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती प्रा. कासार यांच्याकडे संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here