कोकणातील सात जिल्ह्यांच्या प्रारुप किनारा क्षेत्र आराखड्याविरोधात रत्नागिरी जिल्ह्यात ४२८ लेखी आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. गुरुवारी झालेल्या सुनावणीमध्ये पर्यटनदृष्ट्या जिल्हयाचा विकास होणार असेल, तर सीआरझेडमुळे याला खीळ बसणार आहे. तसेच, येथील जनता मराठी भाषिक असतानाही अधिसूचना ही हिंदी व इंग्रजीमध्ये प्रसिद्ध केल्याबद्दलही आक्षेप नोंदवण्यात आले. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी उपस्थितांच्या सूचना, नोंदविण्यात आलेले आक्षेप लक्षात घेऊन, याबाबत मराठीमध्ये अधिसूचना ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती, तहसील कार्यालयात प्रसिद्ध केली जाईल व पुन्हा सुनावणी घेण्यात येईल असे आश्वासन दिले.
