जिल्ह्यात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी

0

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्ह्यात यंदा होळी धूमधडक्यात साजरी करण्यात आली. त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजेच मंगळवारी (दि. २२) आलेल्या रंगपंचमीत तर बच्चे कंपनींसह, तरुणाई आणि आबालवृद्धांनी धमाल केली. जिल्ह्यात सर्वत्रच रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली.

जिल्ह्यात सर्वत्रच परंपरेनुसार होळीनंतर म्हणजे फाल्गुन पौर्णिमा ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत रंगपंचमी साजरी केली जाते. रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण, आनंदाचा सण, उत्साहाचा सण, महाराष्ट्रात या सणाला धुलिवंदन अथवा धूळवड असंही म्हणतात. एकमेकांच्या अंगावर रंग उडवून. पिचकारीने रंगाचे पाणी अंगावर उडवत आणि तोंडाला अथवा कपाळाला रंग लावत हा सण साजरा करण्यात येतो. काही ठिकाणी तर हा सण पाच दिवस साजरा केला जातो. मोठ्यांना आदराने कपाळावर टिळा लावून आणि समवयस्क व लहानांसोबत रंगाची उधळण करत हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो.

कोरडे रंग, गूलाल, अबीर असे रंग अंगाला लावत, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत हा सण जिल्हाभरात साजरा करण्यात आला. गावागावांत नदी आणि विहिरीच्या ठिकाणी पाण्यात भिजत सर्वांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. शहरातही सोसायट्यांमध्ये पाण्याचे टब भरून ठेवण्यात आले होते. एकमेकांवर पाणी उडवत बच्चेकंपनींनी धमाल मस्ती केली.

जिल्ह्यात दुपारच्या सत्रात रंगपंचमी साजरी करण्यात येत असल्याने या कालावधीत रस्त्यावर वाहनांची वर्दळही कमी झाली होती. याशिवाय या दिवशी घरात पुरणपोळी आणि गोडाधोडाचे पदार्थ बनवण्यात आले. अनेकांनी पर्यावरणपूरक रंग वापरून रंगपंचमी साजरी केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:28 AM 23-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here