रत्नागिरीचे तत्कालीन पोलिस अधिकारी मेंगडे यांचा राज्यपालांच्या हस्ते पर्यावरण पुरस्काराने गौरव

0

रत्नागिरी : नवी मुंबई झोन एकचे पोलिस उपायुक्त सुरेश मेंगडे यांचा राष्ट्रीय नागरी पर्यावरण संरक्षण संस्थेच्या वतीने पर्यावरण संवर्धन पुरस्कार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत देण्यात आला.

मुंबई राजभवन येथे हा पुरस्कार वितरण समारंभ नुकताच पार पडला असून, मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असताना सुरेश मेंगडे यांनी अनेक पर्यावरणपूरक उपक्रम राबवले होते. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे जिल्हावासीयांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातील तुरची या ठिकाणी असणाऱ्या दुष्काळग्रस्त भागातील पोलिस प्रशिक्षण केंद्रांमध्ये पाण्याचे दुर्भीक्ष्य असतानाही पडिक व खडकाळ जमिनीवर सुमारे अडीचशे वृक्षांची लागवड केली. त्यांच्या या कामाची दखल घेत २०१३ मध्ये पोलिस प्रशिक्षण केंद्रात वनश्री पुरस्कार देऊन गौरव केला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:49 AM 23-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here