रत्नागिरी: पीडित अल्पवयीन तरुणीशी गैरकृत्य करणाऱ्या संशयिताची ओळख पटवण्यासाठी मनोरुग्णालयातील सर्वच कर्मचाऱ्यांची फोटोनिहाय यादी मागवण्यात आली आहे. रत्नागिरी विभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनानुसार शहर पोलिसांनी तपास सुरू केला. कुकर्म करणारा तो संशयित कोण हे शोधण्यासाठी मनोरूग्णालयाशी संपर्क साधण्यात आला. परंतु सहकार्य मिळाले नाही. गुन्हा दाखल होऊन १० दिवस होत आले तरी तपासात प्रगती झाली नाही. त्यामुळे अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने तपास अधिकाऱ्यांनी अखेर मनोरूग्णालयातील सर्वच स्टाफची फोटोसह यादी मागवणारे पत्र दिले आहे. त्यामुळे लवकरच संशयिताचे नाव पुढे येणार आहे.
