मेव्हणे, मेव्हणे, मेव्हण्यांचे पाहुणे; ईडीच्या धाडीनंतर मनसेने साधला मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष निशाणा

0

मुंबई : महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमागे सुरू असलेला केंद्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीचा ससेमिरा आता थेट मातोश्रीपर्यंत पोहोचला आहे.

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी पुष्पक ग्रुपच्या ६ कोटी ४५ रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील ११ सदनिका सील करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर विरोधी पक्षांकडून शिवसेनाला लक्ष्य करण्यात येत आहे.

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी या धाडीच्या कारवाईनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. आप्‍तांच्‍या तिजोऱ्यांमध्ये मात्र कोट्यवधींची भर. ही संपत्‍ती कुठून आली? कोणाकडून आणली? शिवसैनिकांच्‍या वाट्याला यातील काहीही नाही. सत्ता फक्‍त आपण आणि आपल्‍या नातेवाईकांसाठीच! आगे आगे देखिए होता है क्‍या! असा इशाराच नारायण राणेंनी दिला आहे. तर, दुसरीकडे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दुनियादारी चित्रपटातील एक व्हिडिओ सीन शेअर केला आहे. त्यामध्ये, अभिनेता जितेंद्र जोशी, मेव्हणे, मेव्हणे, मेव्हण्यांचे पाव्हणे… असे म्हणताना दिसून येतो. सध्या 6 सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरुनही व्हायरल होत आहे.

या व्हिडिओसोबतच पाहुणे आले घरापर्यंत.. असे कॅप्शनही संदीप देशपाडे यांनी दिले आहे. मात्र, कुठेही कोणाच्या नावाचा उल्लेख त्यांनी केला नाही. पण, त्यांचा टीकेचा, खिल्ली उडविण्याचा रोख शिवसेनेकडेच असल्याचे दिसून येत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:05 PM 23-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here