बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याने साकारलेल्या ‘तान्हाजी’ या सिनेमातून नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहचण्यास मदत झाली. कोंढाणा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली. याच पार्श्वभूमीवर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जन्मभूमी स्थळाच्या विकासासाठी पाच कोटींची तरतूद करण्याची घोषणा अर्थ राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत केली.
