रत्नागिरी : कोकेन तस्करी प्रकरणी न्यायालयाने तीन आरोपींनान्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यापूर्वी तीन नंबर आरोपी रामचंद्र मलिक याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. चौथा आरोपी अंकित सत्यवीर सिंग याला ३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी मिळालेली आहे. सहावा आरोपी अद्याप पोलिसांना मिळून आलेला नाही. रत्नागिरी एमआयडीसीत २० जुलै रोजी ९३६ ग्रॅम कोकेनसह दिनेश शुभेसिंह, सुनीलकुमार रणवा, रामचंद्र रणवा यांना पकडण्यात आले.५० लाख रूपये किमतीचे कोकेन बाळगणा-या तिघांना २१ जुलै रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांना आठ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. त्यानंतर तामिळनाडू येथील तंजावर एअरफोर्स येथून मुकेश शेरॉन आणि राजस्थान येथील अंकित सत्यवीर सिंग यांना पकडण्यात आले. आरोपी नं. ५ मुकेश शोरान याला तामिळनाडू कोर्टात हजर करून ट्रान्झीट कस्टडी देण्यात आली. त्यानंतर पहिले तीन आणि पाचवा आरोपी मुकेश यांना पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर २९ जुलै रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी आरोपी नं. ३ मलिक याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश झाले. इतर आरोपींना २ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. ही मुदत संपल्यानंतर शुक्रवारी दिनेश शुभेसिंह, सुनीलकुमार रणवा आणि मुकेश शेरॉन यांना शुक्रवारी हजर करण्यात आले. या तिन्ही आरोपींना अतिरिक्त सत्रन्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपी नं.४अंकित सत्यवीर सिंग याला अटक केल्यानंतर त्याला खेड सत्र न्यायालयात हजर केले असता ३ ऑगस्टपर्यंत त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले, दरम्यान, पोलिस कोठडीत झालेल्या चौकशीत आरोपी निष्पन्न झाला असला तर अद्याप तपास करणाच्या रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना मिळून आलेला नाही.
