‘काँग्रेसने त्यांचा उमेदवार भाजपला द्यावा, आम्ही आमदार बनवतो’ : चंद्रकांत पाटील

0

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.

आज भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. दरम्यान, ”काँग्रेसने त्यांचा उमेदवार आमच्याकडे द्यावा,” असे थेट आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेला दिले आहे.

मीडियाशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ”काँग्रेसने त्यांचा उमेदवार भाजपकडे द्यावा, आम्ही आमच्या उमेदवराला माघार घ्यायला लावतो आणि जयश्री जाधव यांना आमदार करतो. अजूनही काही तास शिल्लक आहेत, यावर विचार करावा,” असे थेट आवाहनचं पाटलांनी केले.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे गेल्यावर्षी निधन झाले होते. या जागेवर आता पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने जयश्री चंद्रकांत जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, भाजपने आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. पण, जयश्री जाधव यांनी साधेपणाने अर्ज दाखल केला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:33 PM 23-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here