रत्नागिरी एसटी आगारात 40 कंत्राटी कामगारांची भरती

0

रत्नागिरी : एस.टी. संपाबाबत उच्च न्यायालयात तारीख पे तारीख सुरू असतानाच राज्य शासनाने विलिनीकरणाला नकार दिला आहे. त्यातच संपात गेलेले काही कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होऊ लागले आहेत. रत्नागिरी आगारात सध्या 30 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे रत्नागिरी आगारातून एस.टी.च्या फेर्‍या धावू लागल्या आहेत. त्यात 40 कंत्राटी कामगारांची भर पडली आहे.

4 महिने झाले तरी एस.टी.चा संप सुरूच आहे. एस.टी. कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम असून राज्य शासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यातच हा वाद न्यायप्रविष्ठ असल्याने न्यायालय जो निकाल देईल त्यानंतर एस.टी. कर्मचारी संपाबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. परंतु 4 महिने झाले तरी तारीख पे तारीख सुरूच आहे. संपावर गेलेल्या एस.टी. कर्मचार्‍यांना एकीकडे राज्य शासन कामावर रुजू होण्याचे आवाहन करत आहे. तर दुसरीकडे एस.टी. कर्मचारी न्यालयाच्या आदेशाशिवाय कामावर रुजू व्हायचे नाही या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. हा संप अधिक काळ सुरू आहे. त्यातच कोर्टाच्या तारखा पुढे-पुढे जाऊ लागल्याने संपातील काही कर्मचारी कामावर रुजू होऊ लागले आहेत.

रत्नागिरी आगारात 100 टक्के संप सुरू होता. एकही कर्मचारी कामावर रुजू झाला नव्हता. मात्र 4 महिने होऊन गेले तरी संपाबाबत कोणताही निर्णय न झाल्याने काही कर्मचार्‍यांनी राज्य शासनाच्या आवाहनला प्रतिसाद देत कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रत्नागिरी आगारात 7 चालक, 12 वाहक, 11 चालक तथा वाहक रुजू झाले आहेत. त्यामुळे रत्नागिरी आगारातून एस.टी.च्या फेर्‍या धावू लागल्या आहेत.

दुसरीकडे राज्य शासनाने कंत्राटी कर्मचार्‍यांची भरती करण्याला मंजूरी दिली होती. त्यानुसार रत्नागिरी विभागात 40 कंत्राटी कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. त्यातील 13 कर्मचारी रत्नागिरी आगारात तर 10 कर्मचारी लांजा आगारात रुजू झाले आहेत. कंत्राटी कर्मचार्‍यांची नियुक्ती झाल्याने एस.टी.च्या फेर्‍या वाढण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात 241 प्रशासकीय कर्मचारी, 187 कार्यशाळा कर्मचारी, 106 चालक, 90 वाहक, 95 चालक तथा वाहक असे मिळून 719 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. तर 2509 कर्मचारी अजूनही संपामध्ये सहभागी झाले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:28 AM 24-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here