मुंबई विद्यापीठाचे येस बँकेत अडकले तब्बल १४० कोटी

0

येस बँकेच्या दिवाळखोरीचा फटका अनेक सर्वसामान्य लोकांना तर बसला आहेच. पण त्याचबरोबर देशभरातील अनेक शासकीय संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थाही यामुळे अडचणीत आल्या आहेत. येस बॅंकेवर रिर्झव्ह बॅंकेने निर्बंध आणल्यामुळे देशभरात ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे तब्बल १४० कोटी रुपये येस बँकेमध्ये अडकल्याची माहिती आता सध्या समोर येत आहे. बुडीत गेलेल्या येस बँकेत १४० कोटींच्या ठेवी असल्याची बाब विद्यापीठाच्या सिनेट बैठकीत उघडकीस आले. सिनेट सदस्य सुप्रिया करंडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. मात्र याबाबत कुलगुरूंना सविस्तर उत्तर देता आले नाही. यावर चौकशी समितीची स्थापना करून याची माहिती घेण्याचे आश्वासन कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी दिले मात्र त्यावर समाधान न झाल्याने सदस्यांनी सभा तहकूब केली. ऑगस्ट २०१८ च्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतरच मागील महिन्यात ४ बँकांकडून कोटेशन्स मागविण्यात आले आणि सगळ्यात जास्त व्याजदर देणाऱ्या बँकेत ठेवी ठेवण्याचा निर्णय झाल्याची माहिती प्रकुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी दिली. सिनेट सदस्यांनी घाबरून न जाता विद्यार्थ्यांचे पैसे सुरक्षित आहेत. निर्णय घेतल्यास आत्ताही हे फिक्स्ड डिपॉझिट मोडता येईल अशी माहितीही ही त्यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या ठेवी येस बँकेसोबत इतर आणखी 9 बँकांमध्ये सुरक्षित असल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली. महाविद्यालयांना नॅशनल शेड्यूल्ड बँकेत खाते नसेल तर त्यांची संलग्नता रद्द करण्यात येते असे असताना विद्यापीठाने खासगी बँकेत कसे पैसे ठेवले असा प्रश्न सदस्यांकडून उपस्थित करण्यात आला. विद्यापीठाच्या बजेटमध्ये ठेवींबाबत कोणतीही माहिती सदस्यांना देण्यात येत नाही. हा एक घोटाळा असून यासंदर्भात पोलीस तक्रार करण्याची सदस्यांनी मागणी केली आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here