राजापूर विधानसभा युवक काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष नुईद काझी यांचा सत्कार

0

राजापूर : राजापूर विधानसभा युवक काँग्रेसचे नव-निर्वाचित अध्यक्ष नुईद काझी यांचा नुकताच काँग्रेसच्या मुंबईतील प्रदेश काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे सत्कार करण्यात आला. काँग्रेसचे सोशल मिडिया प्रमुख व युवा कार्यकर्ते विनय खामकर यांनी त्यांचा सत्कार केला.

याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस व ज्येष्ठ नेते मुनाफ हकीम, प्रदेश सचिव श्रीरंग बर्गे, वरिष्ठ नेते डॉ. मनोज उपाध्याय, सोलापूरचे सुभाष पाखरे, पक्ष कार्यालयाचे राजापूरचे ग्रामस्थ गावकर आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

नुईद काझी हे राजापूर तालुक्यातील काँग्रेसचे युवक कार्यकर्ते असून नुकत्याच झालेल्या विधानसभा युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी विजय मिळवत त्यांनी बाजी मारली आहे. युवकांचे चांगले संघटन असलेले काझी हे पक्षकार्यासाठी कायमच सक्रिय आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल त््यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील काझी यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:57 PM 24-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here