जिल्ह्यातील सहा पोलीस उपनिरीक्षकांना सेवा ज्येष्ठतेनुसार बढती

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील ६ पोलीस उपनिरीक्षकांना सेवा ज्येष्ठतेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर बढती मिळाली आहे. बढतीनंतर त्यांची बदलीही झाली आहे.

त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक विजय कार्वेकर हे रत्नागिरी नियंत्रण कक्षात कार्यरत असून त्यांची कोल्हापूर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी बढती झाली आहे. सागरी सुरक्षा शाखेत असलेले विक्रमसिंह पाटील यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक महामार्ग सुरक्षा पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. शहर पोलीस स्थानकात कार्यरत असलेले धनंजय चव्हाण यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाणे ह्या ठिकाणी बढती झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले संदीप वांगणेकर यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक दहशतवाद विरोधी पथकात पदोन्नती मिळाली आहे.

गुहागर पोलीस स्थानकात कार्यरत असलेले दिपक कदम यांची मुंबई शहरात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती मिळाली आहे. चिपळूण पोलीस स्थानकात कार्यरत असलेले विनायक माने यांची ठाणे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी बढती झाली आहे. या सर्वांचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहीतकुमार गर्ग यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
8:39 PM 24-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here