वाटद-खंडाळा दीक्षाभूमी येथे २६ रोजी नूतन कार्यकारिणीची सभा

0

◼️ १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण सभेचे आयोजन

जाकादेवी/ संतोष पवार : रत्नागिरी तालुक्यातील बावीस खेडी बौद्धजन संघ वाटद-खंडाळा या संघटनेच्या नुतन कार्यकारिणीची सभा माजी पदाधिकारी यांच्यासमवेत शनिवार दि.२६ रोजी दुपारी ४ वा. दीक्षाभूमी वाटद- खंडाळा येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे धडाडीचे नुतन अध्यक्ष सुनिल उर्फ भाई जाधव यांनी दिली.

१४ एप्रिल विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे नियोजन करणे, नियोजनानुसार कार्यवाही करण्याबाबत बावीस खेडी बौद्धजन संघटनेचे आजी-माजी पदाधिकारी यांच्यात सुसंवाद साधून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे. कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे १४ एप्रिल डॉ.आंबेडकर जयंती महोत्सव अतिशय उत्साहाने साजरा करण्याचे नियोजन शनिवारी होणाऱ्या सभेत करण्यात येणार आहे.

या सभेला नुतन अध्यक्ष भाई जाधव, सचिव स्वप्निल जाधव, सभापती रजत पवार, संघटनेचे माजी अध्यक्ष शरद जाधव, माजी सचिव शाम पवार, सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव, किशोर पवार, रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष प्रकाश पवार, तालुक्याचे विद्यमान कोषाध्यक्ष मंगेश सावंत यांसह संघटनेची मान्यवर मंडळी तसेच सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
8:39 PM 24-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here