पुण्यात सर्व शाळांना सुट्टी – मुख्यमंत्री

0

राज्यात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनातर्फे अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहे. यानुसार, ‘पुढील आदेशापर्यंत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरातील जिम, चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, नाट्यगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळ अधिवेशनात याबाबतची माहिती दिली. यात दहावी आणि बारावी परीक्षेच्या व्यतिरिक्त पिंपरी-चिंचवड आणि पुणे या ठिकाणच्या शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील शाळा मात्र नियमित सुरु राहतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here