लांजात ‘सीएनजी’साठी छेडणार आंदोलन

0

लांजा : सीएनजी गॅसचा पुरवठा वेळेत होत नसल्याने लांजातील शेकडो रिक्षा व्यावसायिकांनी लांजा तहसील कार्यालयात धडक दिली. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून रिक्षा व्यावसायिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

यावेळी तहसीलदारांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लांजा तालुक्यातील सुमारे पाचशे रिक्षा सीएनजीवर आहेत. अनेक रिक्षा व्यावसायिकांनी बँकांची कर्जे काढून रिक्षा घेतल्या आहेत. मात्र लांजा शहरातील एकमेव सीएनजी असलेल्या पंपावर सीएनजी वेळेत उपलब्ध नसल्याने रिक्षा व्यावसायिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. सीएनजी मिळविण्यासाठी रिक्षा व्यावसायिकांना पाच-पाच तास रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे व्यवसाय करायचा कसा? बँकांची कर्जे भरायची कशी? संसार कसा चालवायचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढील आठ दिवसांत सुरळीत सीएनजी पुरवठ्याबाबत कार्यवाही न झाल्यास आमरण उपोषण छेडण्याचा इशारा नगरसेविका दुर्वा भाईशेट्ये, शिवसेना शहर सचिव प्रसाद भाईशेट्ये यांनी दिला. यावेळी लांजा शहर व तालुक्यातील रिक्षा व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:30 PM 25-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here