आमदारांना मोफत घरं देण्याच्या निर्णयावर संजय राऊतांची असहमती?

0

मुंबई : राज्यातील आमदारांना मोफत घरे देण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या निर्णयाशी असहमती दर्शविली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विधानसभेत याबाबतची घोषणा केली होती. त्यानंतर संजय राऊत यांनी या निर्णयाविषयी नापसंती व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी संजय राऊत यांनी म्हटले की, आमदारांच्या घरांच्याबाबतीत माझी मते वेगळी आहेत. माझाही भाऊ आमदार आहे. पण मला घर नको आहे. मी याबाबत बोलणार नाही. माझे मत वेगळे आहे, अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली. सर्वपक्षीय आमदारांना घरे मिळणार असल्याने विरोधक या मुद्द्यावरून टीका करण्याची शक्यता कमी आहे. मात्र, संजय राऊत यांचे हे वक्तव्य एकप्रकारे सरकारलाच घरचा आहेर आहे.

दरम्यान, ३०० आमदारांसाठी राज्य सरकार मुंबईत घरे बांधणार आहे. राज्याचे प्रश्न मांडणाऱ्या आमदारांनाही कायमस्वरूपी घर मिळाले पाहिजे. सर्वपक्षीय आमदारांना कायमस्वरूपी घरे देत आहोत, याचा आनंद असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:41 PM 25-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here