रत्नागिरी (वार्ताहर) : एकाच दिवशी सर्पदंश झालेल्या तिघांना उपचारा करीता जिल्हारुग्णालयात दाखल केले आहे. त्यामध्ये दोन कामगारांसह एका शिक्षकाचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार चंद्रशेखर प्रभाकर सरदेशपांडे (वय ५२) राहणार संगमेश्वर हे शिक्षक असून बुधवारी ११ वा. च्या सुमारास शाळेत साफसफाई करते असताना त्यांना सर्प दंश झाला. त्यांना उपचारा करिता संगमेश्वर येथे नेण्यात आले तेथून त्यांना जिल्हा हाणालयात दाखल करण्यात आले. दुस-या घटनेत जेएसडब्ल्यू कंपनीत काम करणा-या कामगारांना सर्प दंश झाला. राजू बाबारावं दिपक (वय २०) राहणार जयगड हा तरूण बुधवारी । सकाळी खेकडे पकड़ायला गेला होता. त्यावेळी त्याला सर्प दंश झाला. त्याला प्रथम जयगड येथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचाराकरिता जिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले. तिसया घटनेत राजापूर तालुक्यातील ताम्हाणे येथील संदेश वसंत अमृते (वय २५) या तरूणाला सर्प दंश झाला. संदेश हा पितांबरी कंपनीत साफ सफाई करत असताना त्याला सर्पदंश झाला होता. त्याला प्रथम रावपाटण येथे दाखल करण्यात आले व तेथून पुढील उपचारा करीता जिल्हा ग्णालयात दाखल करण्यात आले.
