वरवेली तेलीवाडीत श्री हसलाई देवीचा वार्षिक समा महोत्सव उत्साहात साजरा

0

गुहागर : गुहागर तालुक्यातील वरवेली तेलीवाडीत श्री हसलाई देवीचा वार्षिक समा महोत्सव श्री काशी विश्वेश्वर मंदिर पटांगणात पार पडला. या महोत्सवात आबाल वृद्धानी ढोल ताशांच्या गजरात श्री हसलाई देवीची पालखी नाचविण्याचा आनंद घेतला.

गेली दोन दिवस वरवेली गावची ग्रामदेवता श्री हसलाई देवीची पालखी तेलीवाडीतील नागरिकांच्या घर भेटीला आली आहे. श्री हसलाई देवीच्या सहाणेवरून हसलाई देवीची पालखी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत वाडीत आणण्यात आली. दोन दिवस प्रत्येकाच्या घरी आलेल्या पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. देवीच्या पालखीला नवस बोलले जातात, तर नवस फेडले जातात.

शिमगा उत्सवासाठी मुंबई, पुणे व इतर ठिकाणाहून भाविक याठिकाणी येत असतात. प्रत्येक घरी भाविकांसाठी प्रसाद दिला जातो. पहिल्या दिवशी नेमून दिलेली घरे झाल्यावर रात्री समा आयोजित केला जातो. त्यावेळीही पालखी नाचविली जाते. दोन दिवस वाडीतील नागरिकांच्या घरी पालखी भेट दिल्यावर रात्री जल्लोषात समा महोत्सव साजरा झाला. वाडीतील तरुणांनी वेगवेगळ्या चालीवर पालखी नाचविली. पालखी समा महोत्सव झाल्यानंतर पालखी सहाणेवर नेण्यात आली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:49 PM 25-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here