खेडमधील त्या दोन्ही संशयितांचे रिपोर्ट ‘निगेटीव्ह’

0

पुणे शहरासह पिंपरी चिंचवडमध्ये शिरकाव केलेल्या करोना आजार हळूहळू पसरत आहे. दरम्यान, खेड तालुक्‍यातील एका गावात परदेशातून आलेल्या दोन संशयित रुग्णांची मंगळवारी (दि. 10) पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये तपसणी करण्यात आली होती. गुरुवारी (दि. 12) त्यांचे रिपोर्ट ‘निगेटीव्ह’ आले असून निगेटिव्ह आली आहे, तरीही खबरदारी म्हणून खेड पंचायत समितीत ‘शीघ्र प्रतिसाद कक्षा’ची स्थापना करण्यात आली आल्याची माहिती प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिली. करोनाचा संसंर्ग जन्य रोगाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी आणि जनजागृती करीता सर्व प्रशासकीय प्रमुखांसह, विविध शैक्षणिक, सामाजिक, स्वंयसेवाभावी संस्थाच्या प्रतिनिधीची बैठक प्रांत कार्यालयात शुक्रवारी (दि. 13) प्रांताधिकारी तेली यांनी घेऊन नियोजनाचा, खबरदारीच्या उपाय योजनाबाबतचा आढावा घेतला. यावेळी तहसीलदार सुचित्रा आमले, खेड तालुका डॉक्‍टर असोशिएनचे अध्यक्ष डॉ. विलास काजळे, तालुका आरोग्य अधिकारी बी. बी. गाढवे, आळंदी रुग्णालय डॉ. जी. जी. जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एम. बी. कणकवले, प्राचार्य डॉ. एच. एम. जरे, प्रा. एस. एन. टाकळकर, मुख्याध्यापिका ए. एस. गुजराथी, जे. एस. ठाकूर, एस. एस. कांबळे, व्ही. के. खोमणे, संचिता ढवळे, उज्वला तांबे, एस. टी. बस आगार निरीक्षक महेश विटे, पी. एस. आय. भारत भोसले, कक्ष अधिकारी रमेश इष्टे, शिक्षण विस्तार अधिकारी बाळकृष्ण कळमकर, बाल प्रकल्प अधिकारी एस. टी. दुधाळकर, आरोग्य सहायक एन. एस. कांबळे, आर. बी. ढाकणे आदि उपस्थित होते. तसेच दक्षता म्हणून एस.टी.ने अथवा इतर वाहनातून प्रवास करताना प्रवाशांनी खबरदारीचे उपाययोजना करुन प्रवास करावा यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी याविषयी जास्तीत जास्त आपल्या परीसरातील घरातील कुंटुबापर्यत जनजागृती करण्यासाठी मदत घेण्यात येत आहे. सोशल मीडियावर वेगवेगळ्या चुकीच्या पद्धतीने पसरवण्यात येणाऱ्या अफवाबाबत पोलीस यत्रंणेमार्फत लक्ष ठेवले जात आहे. गावपातळीवर शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. करोन संसर्ग व्हायरस आजाराबाबत नागरिकांनी भीती न बाळगता योग्य ती काळजी घेऊन प्रशासनाच्या आणि आरोग्य विभागाच्या वतीने दिल्या जाणऱ्या सूचना आणि उपाय योजनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन तहसीलदार सुचित्रा आमले यांनी केले आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here