रत्नागिरीतील बारा वाड्यांचे ग्रामदैवत भैरीबुवाला रंगपंचमीला शुक्रवारी दुपारी रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाकडून सलामी देण्यात आली. त्यानंतर सहाणेवर बसलेली पालखी उठवल्यानंतर भक्तगणांनी रंगांची उधळण केली. शहरात त्यानंतर खऱ्या अर्थाने रंगपंचमीला सुरुवात झाली. फाल्गुन पंचमीला कालभैरवाच्या शिमगोत्सवाची सांगता झाली.
