रत्नागिरीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; ‘त्या’ तिघांना न्यायालयीन कोठडी

0

रत्नागिरी : शहरातील एका मैदानावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तीन संशयित तरुणांना पाेलिसांनी अटक केली आहे.

न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये उजेफ तन्वीर वस्ता (22, रा.
राजीवडा), अनिकेत प्रकाश नाखरेकर (24, रा. निवखोल) व ऋषिकेश मधुकर टिकेकर (22, रा. निवखोल) यांचा समावेश आहे.

ग्रामीण भागात शिमगोत्सव सुरू असताना अल्पवयीन मुलगी होळी पाहण्यासाठी घराबाहेर पडली होती. याचा फायदा घेऊन यातील एका संशयिताने त्या मुलीला मैदानाच्या जंगलमय भागात नेले. त्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या घटनेनंतर संशयितांनी पीडितेला घराच्या अलीकडे सोडले. पीडितेच्या नातेवाइकांनी चौकशी केली असता घडला प्रकार तिने सांगितला. त्यानंतर पीडितेच्या नातेवाइकांनी तिला शहर पोलीस स्थानकात नेले. त्यानंतर तिने पोलीस स्थानकात तक्रार दिली. पोलिसांकडून पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, तिघांना अटक केली. अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:15 PM 26-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here