नवविवाहितेच्या आत्महत्येने राजापुरात खळबळ

0

राजापूर शहरातील साखळकर वाडीतील एका नवविवाहितेने राहत्या घरी ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. यातील मृत महिलेचे नाव रणिता किरण काथवटे असून ती बावीस वर्षीय होती. ती शहरातील किरण दीपक काथवटे याच्याशी दि. १७ फेब्रुवारी २०२० मध्ये विवाहबद्ध झाली होती. शुक्रवारी दि. १३ मार्चला सकाळी रणिताच्या पोटात दुखत होते. तिला उपचारासाठी तिचा पती किरण तिला राजापूर ग्रामीण रुग्णालयात घेवून गेला होता. मात्र गर्दी असल्याने उपचार न करता ती पुन्हा माघारी परतली. तिचा पती किरण हा शहरातील एका हॉटेलात काम करतो. दुपारी तो घरी गेला असता घर बंद होते म्हणून त्याने पत्नी रणिताला हाका मारल्या. मात्र दरवाजा उघडला गेला नाही. म्हणून त्याने बाजूच्या खिडकीतून आत डोकावून पाहिले असता, रणिता घराच्या वाशाला लोंबकळताना दिसून आली. नवविवाहीतेच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. याबाबत राजापूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून याबाबतचा तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही.व्ही. पाटील करीत आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here