वीज कंपन्यांमधील कर्मचारी, अधिकारी, अभियंता, कंत्राटी कर्मचारी दोन दिवस संपावर

0

रत्नागिरी : महावितरण महापारेषण महानिर्मिती या तिन्ही कंपन्यामधील कर्मचारी, अधिकारी,अभियंते व कंत्राटी कर्मचारी यांच्या संघटनांच्या कृती समितीने दि. २८ व २९ मार्च २०२२ रोजी वीज कंपन्याच्या खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी, जल विद्युत प्रकल्पांवे खाजगीकरण रोखण्यासाठी, कंत्राटी आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांना वयाच्या ५८ वर्षांपर्यंत नोकरीची हमी तसेच वीज कंपन्यांमध्ये कायम करण्यासाठी वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संघटना संयुक्त कृती समिती मधील वर्कर्स फेडरेशन एस. ई.ए. विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगारयुनियन इत्यादी २७ संघटना तसेच कंत्राटी कर्मचारी संघटनांनी संप पुकारला आहे.

त्यामध्ये सर्व कर्मचारी अधिकारी अभियंते कंत्राटी कर्मचारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती महापारेषण रत्नागिरी (सिंधुदुर्ग) विभागाचे सविव तथा वर्कर्स फेडरेशन केंद्रीय कार्यकारीणी सदस्य कॉमेड शरद मयेकर यांनी दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:57 PM 26-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here