रत्नागिरी : शहरातील रामआळी येथील पिठाच्या गिरणीसमोर एका दुकानाच्या आडोशाला बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी शुक्रवार २५ रोजी दुपारी ११.५५ धाड टाकली.
यात ७६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शेखर वसंत पिलणकर (६०, रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिातचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिस नाईक दीपराज पाटील यांनी तक्रार दिली आहे.
त्यानुसार, त्या ठिकाणी जुगाराचे साहित्य व रोख रक्कम घेऊन बेकायदेशीरपणे जुगार खेळ चालवत होता. त्याच्यावर महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक मोहिते करीत आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:16 PM 26-Mar-22