‘मधू दंडवते’ एक्सप्रेस सुरू करा – शिवसेनेची मागणी

0

कोकण रेल्वेचे शिल्पकार असणाऱ्या मधू दंडवते यांचे अमूल्य योगदान लक्षात घेऊन केंद्र सरकारने ‘मधू दंडवते एक्सप्रेस’ सुरू करावी अशी आग्रही मागणी शिवसेनेने लोकसभेत केली. केंद्रीय अर्थसंकलपाच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना शिवसेना गटनेते खासदार विनायक राऊत यांनी कोकणातील रेल्वे प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. मधू दंडवते यांच्या अथक प्रयत्नाचे फलित कोकण रेल्वे आहे. त्यामुळे कोकणवासीयांच्या मनात दंडवते यांच्याबद्दल आदराची भावना आहे. मधू दंडवते यांच्या नावाने एक्स्प्रेस सुरू केल्यास त्यांच्या कार्याचा एक प्रकारे गौरवच होईल. त्यामुळे रेल्वेमंत्र्यांनी कोकणवासीयांची लोकभावना लक्षात घेऊन ‘मधू दंडवते एक्सप्रेस’ सुरू करावी, अशी आग्रही मागणी खासदार विनायक राऊत यांनी यावेळी केली.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here