आमच्या आजुबाजूने लहानसा दगडही भिरकावला गेला, तर..; निलेश राणेंचा पोलिसांना इशारा

0

रत्नागिरी : किरीट सोमय्या यांना दापोलीत पाय ठेवू देणार नाही, अशा वल्गना अनेकजण करत होते. पण आमच्या पाठी गाड्यांचा ताफा पाहाल तर पाय काय आमचं अख्खं शरीरच दापोलीत आलं आहे. आम्ही याठिकाणी शांतपणे आलो आहोत. आता शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आमच्या दिशेने दगडाचा लहानसा तुकडाही भिरकावला तर आम्ही गप्प बसणार नाही, हे मी पोलिसांना आधीच सांगून ठेवतो, असा इशारा भाजप नेते निलेश राणे यांनी दिला.

किरीट सोमय्या शनिवारी दापोलीत दाखल झाले तेव्हा निलेश राणे यांच्या कार्यकर्त्यांचा ताफा त्यांच्या दिमतीला होता. या दोन्ही नेत्यांनी दापोलीत शिवसेनेवर सडकून टीका केली.

मी दोन दिवसांपूर्वीच सांगितले होते की, रत्नागिरीत आम्हाला रोखण्याचा प्रयत्न सोडून द्या. ठाकरेंच्या बापजन्मात ते कोणालाही जमणार नाही. किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याला अभूतपूर्व अशी गर्दी जमली आहे. दापोलीतील ही गर्दी न भूतो न भविष्यती अशी आहे. यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारले आहे. आम्हाला दापोलीत अडवण्याच्या धमक्या देत होते, ते कुठेतरी कोपऱ्यात काळे झेंडे घेऊन उभे राहिलेत, असा टोला निलेश राणे यांनी लगावला.

या भाषणानंतर निलेश राणे हे किरीट सोमय्या यांच्यासोबत दापोली पोलीस ठाण्यात गेले. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले. या झटापटीत निलेश राणे यांना धक्काबुकी झाली. त्यामुळे निलेश राणे चांगलेच संतापले. तु्म्ही माझ्या अंगाला हात कसा लावला, असा सवाल निलेश राणे यांनी पोलिसांना विचारला. यानंतर आता किरीट सोमय्या दापोली पोलीस ठाण्यात गेले आहेत. आता त्यांना मुरूड येथील साई रिसॉर्टवर जाऊ दिले जाणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:17 PM 26-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here