१६ मार्चला महिला लोकशाही दिन

0

रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याला तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो. यावेळी अर्जदार स्वत: उपस्थित राहून निवेदन सादर करतात व त्या अनुषंगाने जिल्हास्तरावरील महिला संबधित अधिकारी यांना कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात येतात. त्याचप्रमाणे माहे फेब्रुवारी २०२० चा महिला लोकशाही दिन सोमवार दि. १६ मार्च २०२० रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्हयाची भौगोलिक स्थिती लक्षात घेता ज्या महिलांना लोकशाही दिनास प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही, अशा महिलांच्या सोयीच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांना प्रायोगिक तत्वावर फोनद्वारे संपर्क करून १६ मार्च २०२० रोजीच्या महिला लोकशाही दिनात जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या १०७७ या टोल फ्री क्रमांकावर दुपारी १२ ते १ या वेळेत त्यांचे निवेदन/अर्ज नोंदविता येतील, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समिती, रत्नागिरी यांनी कळविले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here