महाराष्ट्रात सोमवारी एकही कोरोना मृत्यू नाही

0

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या 24 तासात एकाही कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झालेला नाही. राज्यात 110 नवे रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 72 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 964 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात सोमवारी एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,24,875 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 92, 74,099 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

राज्यात सध्या 964 ऍक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 290 ऍक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल ऍक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 164 ऍक्टिव्ह रुग्ण आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:45 AM 29-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here