जि. प. च्या जाहीर झालेल्या आदर्श शाळा पुरस्कारांचे २० ला वितरण

0

रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून प्राथमिक शाळांना दिले जाणारे आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कारांचे वितरण येत्या २० मार्च रोजी होणार आहे. शिक्षण क्षेत्रात प्रतिष्ठेचे व महत्वाचे मानले जाणारे हे आदर्श शाळा पुरस्कार शुक्रवारी शिक्षण सभापती सुनील मोरे यांनी जाहीर केले. यावेळी शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे, जि. प. सदस्य उदय बने आदी उपस्थित होते. यावर्षी आदर्श शाळा पुरस्कारासाठीच्या १७ आणि विशेष पुरस्कारासाठीच्या १० शाळांचा समावेश आहे. कनिष्ठ प्राथमिक शाळांमध्ये तिडे आदिवासीवाडी (मंडणगड), सालदुरे (दापोली), आवाशी मालकर (खेड), सावर्डे भुवडवाडी (चिपळूण), तळवली शाळा क्र. ३ आगरवाडी (गुहागर), कोंड्ये क्र. ४ (संगमेश्‍वर), नेवरे बाजेकुंभ (रत्नागिरी), कोंडगे क्र. १ (लांजा) तर विशेषसाठी नानटे चिंचवाडी (दापोली), आंबवली, सवणस (दोन्ही खेड), तेर्‍ये क्र. १ (संगमेश्‍वर), तरवळ मायंगडेवाडी (रत्नागिरी) या शाळांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. वरिष्ठ प्राथमिक गटामध्ये शेडवई (मंडणगड), बोरिवली (दापोली), कुरवळ जावळी तांबड (खेड), तुरंबव क्र. १ (चिपळूण), वेलदूर नवानगर मराठी (गुहागर), दाभोळे क्र. २ (संगमेश्‍वर), नाखरे क्र. १ (रत्नागिरी), बेनी बुद्रुक क्र. १ (लांजा), सोलगाव क्र. २ (राजापूर) तर विशेषसाठी पिंपळीबुद्रुक (चिपळूण), पिरंदवणे क्र. १, मोर्डे क्र. १ (दोन्ही संगमेश्‍वर), कुरतडे क्र. १, रानपाट (दोन्ही रत्नागिरी) यांची निवड करण्यात आली. या पुरस्कारांचे वितरण २० मार्च रोजी लोकनेते श्यामराव पेजे सभागृहात सकाळी ११.३० वाजता होणार आहे. यावेळी जि.प.अध्यक्ष रोहन बने, उपाध्यक्ष महेश नाटेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे, शिक्षण सभापती सुनील मोरे, बांधकाम व आरोग्य सभापती महेश म्हाप, महिला व बालकल्याण सभापती रजनी चिंगळे, समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here