रत्नागिरी : मार्च महिन्यात गुढीपाडवा तसेच सुट्टीच्या दिवशी वाहनांची मोठया प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता असून या दिवशी अशा नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून नागरिकांना वाहनाचा ताबा मिळावा व त्याअनुषंगाने शासकीय महसूल जमा व्हावा याकरिता सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालय सुरु ठेवण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी यांनी कळविले आहे. शनिवार २१ मार्च, रविवार २२ मार्च २०२० तसेच बुधवार २५ मार्च २०२० गुढीपाडवा, शनिवार २८ मार्च व रविवार २९ मार्च २०२० रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु राहणार आहेत.