उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री जयंत पाटील यांनी घेतली नाराज आ. भास्कर जाधव यांची भेट

0

रत्नागिरी: शिवसेनेत नाराज असलेल्या आमदार भास्कर जाधव यांची भेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील यांनी घेतली. अजित पवार हे आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या लग्नासाठी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. या वेळी अजितदादा आणि जयंत पाटलांनी भास्कर जाधवांची भेट घेतली. या भेटीनं भास्कर जाधवांचा चेहरा खुलला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. जाधव यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घरीही नेले. यावेळी भास्कर जाधव स्वतः ड्रायव्हर सीटवर बसले होते. शिवसेनेत नाराज असलेल्या भास्कर जाधव राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आगतस्वागत मनापासून करत होते.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here