राजापूर : जैतापूर एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व श्रीमती स्नेहलता रामचंद्र मांजरेकर कनिष्ठ महाविद्यालयच्या स्थानिक सल्लागार मंडळाचे कार्यवाह पत्रकार सचिन नरेंद्र नारकर यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवार १५ मार्च रोजी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. शाळेच्या गोखले सभागृहात सकाळी १०.३० वाजता ही शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्वांनी सदर सभेला उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.
